अंगणवाडी पोषण आहारात पुन्हा सुकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:44+5:302021-07-10T04:22:44+5:30
तेर - महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने बालक व गर्भवती महिलांना पोषण आहार पुरविण्यात येतो. या याेजनेच्या माध्यमातून ...
तेर - महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने बालक व गर्भवती महिलांना पोषण आहार पुरविण्यात येतो. या याेजनेच्या माध्यमातून आजवर गहू, तांदूळ, डाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ आदी साहित्य उपलब्ध करून दिले जात हाेते. मात्र, मागील काही दिवसांत उपराेक्त साहित्याचे दर वाढल्याने आता आहारात सुकडी देण्यात येऊ लागली आहे. याबद्दल लाभार्थींतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
शून्य ते सहा वयाेगटातील बालकांसह गराेदर महिलांना पाेषण आहार दिला जाताे. कुपाेषणाचे प्रमाण कमी व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडून पुरविण्यात येत असलेल्या या आहारात गहू, तांदूळ, डाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ हे साहित्य पुरविले जात हाेते. असे असतानाच मागील काही दिवसांत खाद्यतेलासह अन्य साहित्याचे दर भडकले आहेत. परिणामी उपराेक्त साहित्य पुरवठा करणे कठीण झाल्याचे सांगत पाेषण आहारात आता सुकडी वाटप करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थींतून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.