राखी पौर्णिमेमुळे एसटी बसला प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:24+5:302021-08-21T04:37:24+5:30
उस्मानाबाद : राखी पाैर्णिमानिमित्त प्रवाशांची संख्या वाढली असून, महामंडळाच्या वतीने बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा आगारातून ३२ ...
उस्मानाबाद : राखी पाैर्णिमानिमित्त प्रवाशांची संख्या वाढली असून, महामंडळाच्या वतीने बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा आगारातून ३२ जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
राखी पौर्णिमेला महिला भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. तर भाऊरायाही आपल्या बहिणीच्या गावी जाऊन राखी बांधून घेत असतात. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते;परंतु गतवर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे महिलांना आपल्या माहेरी जाता आले नाही. दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे माहेरी जाणाऱ्या महिलांची गर्दी वाढली आहे. उस्मानाबाद बसस्थानकात प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
उस्मानाबाद-सोलापूर
उस्मानाबाद-लातूर
उस्मानाबाद-कळंब-परभणी
उस्मानाबाद-पुणे
उमरगा-लातूर
उमरगा-पुणे
प्रवाशांची गर्दी
उस्मानाबाद विभागाच्या सहा आगारातून सध्या ३३० बस धावू लागल्या आहेत.
प्रतिदिन १ लाख ३५ हजार किलोमीटर प्रवास होत असून, यातून एसटीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
मागील आठ दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.
राखी पौर्णिमेला प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे जादा बस सोडण्यात येत आहेत. उस्मानाबाद आगारातून लातूर, सोलापूर, पुणे या मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय, कळंबमार्गे परभणी बस सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांना बसमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद