शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग

By गणेश कुलकर्णी | Published: June 20, 2024 03:50 PM2024-06-20T15:50:33+5:302024-06-20T15:51:00+5:30

शिक्षक नियुक्तीसह भौतिक सुविधांच्या मागणीसाठी रस्त्यावर भरविली शाळा

Due to lack of teachers and physical facilities, the villagers boycotted the school; A class filled on the street | शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग

शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग

ढोकी (धाराशिव ) : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत मागील एका वर्षापासून रिक्त असलेली शिक्षकाची जागा न भरल्यामुळे तसेच मागील दोन वर्षांपासून शौचालय बंद असल्याने ढोकी ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप लावून रस्त्यावर शाळा भरविली. सकाळी अकरा वाजल्यापासून हे  आंदोलन सुरू असून दुपारी दोन वाजे पर्यंत शिक्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी येथे आले नव्हते. 

ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत मागील एका वर्षापासून शिक्षकाचे पद रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशाला व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा या तीन्ही शाळेत शौचालयाची दुरवस्था, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध मागण्यासाठी शैक्षणिक समिती व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी  शाळेला कुलूप लावून रस्त्यावर शाळा भरविण्यात आली.

Web Title: Due to lack of teachers and physical facilities, the villagers boycotted the school; A class filled on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.