दिवसभरात १९५ रूग्ण बरे हाेऊन परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:28 AM2021-04-05T04:28:42+5:302021-04-05T04:28:42+5:30

२५२ नवीन रूग्णांची भर -उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक १५७ रूग्णउस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन ...

During the day, 195 patients recovered and returned home | दिवसभरात १९५ रूग्ण बरे हाेऊन परतले घरी

दिवसभरात १९५ रूग्ण बरे हाेऊन परतले घरी

googlenewsNext

२५२ नवीन रूग्णांची भर -उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक १५७ रूग्णउस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिदिन दाेनशेपेक्षा अधिक रूग्णांची भर पडत आहे. असे असतानाच दुसरीकडे उपचाराअंती बरे हाेणार्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी दिवसभरात १९५ रूग्ण बरे हाेऊन घरी परतले.

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायाेजना केल्या जात आहे. एवढेच नाही तर काेराेना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. असे असतानाही मागील काही दिवसांपासून प्रचंड गतीने बाधितांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेसह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. दिवसभरात ५०४ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठिवण्यात आले हाेते. यापैकी ३१८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असता, ७९ जण पाॅझिटिव्ह आले. २३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर ९ जणांचा अहवाल निष्कर्षाप्रत पाेहाेचला नाही. तसेच आणखी ५०४ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. आरटीपीसीआर साेबतच रॅपिड ॲंटीजन टेस्टवरही भर देण्यात आला आहे. दिवसभरात ६७७ जणांची चाचणी करण्यात आली. यातील १७३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तर५०४ जणांचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला.

चाैकट...

उस्मानाबादेतील सर्वाधिक रूग्ण

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात रूग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात १५७ रूग्ण आढळून आले आहेत. यानंतर तुळजापूर तालुक्यात २३, उमरगा २३, लाेहारा सहा, कळंब १०, वाशी ८, भूम २ तर परंडा तालुक्यात १९ रूग्ण आढळून आले आहेत. काेराेना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक पडणारी भर लक्षात घेता, प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे गरजेचे आहे.

‘समाजकल्याण’मधील एकजण दगावले

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील आजवर चार जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यापैकी वरिष्ठ सहाय्यक असलेल्या एका कर्चार्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आता कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांनीही आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: During the day, 195 patients recovered and returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.