चिमुकल्या हातांनी साकारल्या पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:51+5:302021-09-09T04:39:51+5:30
उस्मानाबाद : एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नूतन विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी मातीच्या पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा ...
उस्मानाबाद : एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नूतन विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी मातीच्या पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात ऑनलाईन ६२०, तर प्रत्यक्ष हजर राहून ३० अशा एकूण साडेसहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपापल्या कल्पकतेतून वेगवेगळ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार केल्या.
याचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, कार्यशाळेच्या मार्गदर्शिका रोहिणी नायगावकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम मुंडे, सचिव प्रवीण गोरे, नेताजी राठोड, प्रशांत जाधवर, मुख्याध्यापक प्रदीप गोरे, अंजली विळेगावे, ‘एकता’चे सचिव आभिलाष लोमटे, आदींची उपस्थिती होती.
सध्याच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांवर आधुनिक उपक्रमासोबत आपली संस्कृती जतन करण्याचे संस्कार रुजविणेही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अस्मिता कांबळे यांनी यावेळी केले. प्रेमाताई पाटील यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच या उपक्रमाच्या पाठीशी राहील, असे सांगितले. आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी रोहिणी नायगावकर व अंजली विळेगावे यांनी गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून ६२० विद्यार्थी, तर प्रत्यक्षात ३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. सूत्रसंचालन शीतल देशमुख व आभारप्रदर्शन शेषनाथ वाघ यांनी केले.