आठ लाखांच्या साहित्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:57+5:302021-07-11T04:22:57+5:30
उमरगा : समाज विकास संस्था व ऑक्सफम इंडिया संस्थेच्या वतीने उमरगा उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य उपयोगी सुमारे आठ लाख ...
उमरगा : समाज विकास संस्था व ऑक्सफम इंडिया संस्थेच्या वतीने उमरगा उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य उपयोगी सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या साहित्याची मदत शनिवारी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोविड रुग्णांच्या मदतीसाठी समाज विकास संस्था व ऑक्सफम इंडिया मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करत आहे. उमरगा उपजिल्हा रुग्णालयासाठी या संस्थेकडून ८ ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट बॉक्स, ५ कॉट, मास्क बॉक्स, सॅनिटायझर असे आठ लाखांचे साहित्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे भूमिपुत्र वाघ, तहसीलदार संजय पवार, ऑक्सफम इंडिया संस्थेचे समन्वयक पाटील, नोडल कोविड अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, प्रा. युसूफ मुल्ला आदींची उपस्थिती होती.