उमरग्यात पडली आठ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:20+5:302021-03-10T04:32:20+5:30

दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या ...

Eight more patients fell into old age | उमरग्यात पडली आठ रुग्णांची भर

उमरग्यात पडली आठ रुग्णांची भर

googlenewsNext

दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३२ रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये आरोग्यनगर ३, पतंगे रोड १, गुंजोटी १, तर बालाजी नगरातील एकाचा समावेश आहे. याशिवाय मंगळवारी सकाळी आलेल्या ६४ स्वॅब अहवालात उमरगा पोलीस ठाण्यातील दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवसात ८ कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सोमवारी २६ रॅपिड अँट्जन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये आरोग्यनगर येथील दोन तर गणेश मार्केटमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. ६ मार्च रोजी पाठविलेल्या १५ स्वॅबचे अहवाल रविवारी रात्री निगेटिव्ह प्राप्त झाले. मंगळवारी ४७ स्वॅब घेण्यात आले असून, अद्याप ७६ स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.

सध्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात २१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, ६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

Web Title: Eight more patients fell into old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.