तामलवाडी ठाण्याअंतर्गत १२ गावात ‘एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:16+5:302021-09-11T04:33:16+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी सपोनि सचिन पंडीत यांनी ...

'Ek Ganpati' in 12 villages under Tamalwadi Thane | तामलवाडी ठाण्याअंतर्गत १२ गावात ‘एक गणपती’

तामलवाडी ठाण्याअंतर्गत १२ गावात ‘एक गणपती’

googlenewsNext

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी सपोनि सचिन पंडीत यांनी गावभेटी देवून मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या बैठक घेवून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते. यानुसार कदमवाडी, काटी, सावरगाव, दहीवडी, केमवाडी, नांदुरी, वडगाव (काटी), जळकोटवाडी, सावंतवाडी, गवळेवाडी, यमगरवाडी, गोंधळवाडी या गावात ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. दरम्यान, तर कोरेवाडी, वानेवाडी, गंजेवाडी गावात सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली नाही. उत्सव काळात शांतता कायदा सुव्यावस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘एक गांव एक गणपती’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सपोनि सचिन पंडीत, पोलिस उपनिरीक्षक रमेश घुले, बीट अंमलदार गोरोबा गाढवे, संजय राठोड, गीरी, आकाश सुरनर आदी पोलीस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

चौकट .

वर्गणीविना उत्सव

मागील २५ वर्षापासून सांगवी (काटी) येथील शिवाजी तरूण मंडळ हे वर्गणीविना गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाही मंडळाने ही परंपरा कायम राखली असून, या उत्सवानिमित्त कोरोनावर आधारित पोस्टर प्रदर्शन, रक्तदान शिबीर, अन्नदान आदी उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमेश रोकडे, विष्णू मगर, रामदास मगर, महेश पाटील, श्रीकांत कुलकर्णी, दीपक पाटील, सुधाकर शेळके, आप्पाराव मगर, नागनाथ मगर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: 'Ek Ganpati' in 12 villages under Tamalwadi Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.