खडकी शिवारातून विद्युत पंप चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:55+5:302021-05-29T04:24:55+5:30

अवैध दारू विक्री उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) शिवारातील अशोक ढाबा येथे संदीप जाधव यांनी अवैध विक्रीच्या उद्देशाने ...

Electric pump stolen from Khadki Shivara | खडकी शिवारातून विद्युत पंप चोरीस

खडकी शिवारातून विद्युत पंप चोरीस

googlenewsNext

अवैध दारू विक्री

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) शिवारातील अशोक ढाबा येथे संदीप जाधव यांनी अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारूच्या २० बाटल्या बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरूध्द तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंद केला.

दुकानदारांवर गुन्हे

उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून येथील उत्तम शिंदे, काटगाव येथील युवराज माळी, तुळजापूर येथील नागेश माने यांनी दुकान सुरू ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले. यावरून या तिघांविरुध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

भरपाईची मागणी

उस्मानाबाद : तालुक्यातील भानसगाव शिवारात १८ मे रोजी झालेल्या वादळी पावसात आपल्या पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. यामुळे याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भानसगाव येथील शारदाबाई बप्पा गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Electric pump stolen from Khadki Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.