जिल्हा परिषद शाळेत वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:31 AM2021-03-10T04:31:53+5:302021-03-10T04:31:53+5:30
उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका ...
उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका सरिता उपासे, सोनाली मुसळे,ममता गायकवाड, शिल्पा चंदनशिवे व संजय रुपाजी उपस्थित होते. ४९ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात पाचवी ते सातवीच्या गटातून प्रतीक्षा मोरे, सोनाली इगवे व जानवी कावाले तर मोठ्या गटातून पायल काळे, श्वेता कांबळे व स्नेहा घोडके यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संजय रुपाजी व शिल्पा चंदनशिवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमासाठी सुनीता राठोड, कविता केदारे, सुमन साठे यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख सरिता उपासे, सूत्रसंचालन नादिया शाहेदिवान व भूमिका दुबे यांनी केले. आभार अस्मिता कांबळे यांनी मानले.