४६१ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:45 AM2021-02-26T04:45:45+5:302021-02-26T04:45:45+5:30
चौकटी... ही कामे आहेत सुरू... जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू असून, ग्रामपंचायतस्तरावरून २६२, कृषी विभागाच्या वतीने १२, ...
चौकटी...
ही कामे आहेत सुरू...
जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू असून, ग्रामपंचायतस्तरावरून २६२, कृषी विभागाच्या वतीने १२, वनविभागाची ९४ कामे व सामाजिक वनीकरण विभाग २४६ कामे आहेत. यामध्ये घरकुल, सिंचन विहिरी, फळबाग लागवड, विहीर पुनर्भरण, रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, बांधावरील वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश आहे.
आर्थिक वर्षात एका कुटुंबाला कमीतकमी १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. रोजगार हमीच्या कामावर असणाऱ्या मजुराला दिवसाला २०६ रुपये दिले जायचे. पण, गेल्या वर्षी एप्रिलपासून मजुरीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला २३८ रुपये मजुरांना मिळत आहेत. त्यातच आठ दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होत असल्याने मजुरांना आधार मिळतो.
तालुकानिहाय कामावर मजुरांची संख्या
तालुका कामे सुरू असलेल्या ग्रा.पं. मजूर
भूम १५ १८२
कळंब २७ ३९३
लोहारा ११ १२८
उमरगा १५ १९८
उस्मानाबाद ३७ ४३५ परंडा १२ ७२
तुळजापूर २८ ७६०
वाशी ४२ १५२.