प्रत्येक शाळेने ‘मियावाकी जंगल निर्मिती’ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:35+5:302021-07-17T04:25:35+5:30

(फोटो : गुणवंत जाधवर १५) उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलने केलेली मियावाकी जंगल निर्मिती कौतुकास्पद असून, मियावाकी जंगल ...

Every school should do ‘Miyawaki Forest Creation’ | प्रत्येक शाळेने ‘मियावाकी जंगल निर्मिती’ करावी

प्रत्येक शाळेने ‘मियावाकी जंगल निर्मिती’ करावी

googlenewsNext

(फोटो : गुणवंत जाधवर १५)

उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलने केलेली मियावाकी जंगल निर्मिती कौतुकास्पद असून, मियावाकी जंगल निर्मिती ही संकल्पना प्रत्येक शाळेने राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले.

लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी गुरुवारी येथील जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली. यावेळी शाळेत चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख सरिता उपासे यांनी करून दिली. जिल्ह्यातील पहिले आयएसओ मानांकित, पहिले तंबाखूमुक्त असलेल्या या हायस्कूलने मियावकी जंगली निर्मिती, २ लाख ११ हजार रुपये लोकवाटा, अटल टिंकरिंग लॅब, मिनी सायन्स लॅब, ऑनलाईन शिक्षण ब्रिज कोर्स असे विविध उपक्रम राबविले आहेत. याबद्दल डॉ. मोरे यांनी समाधान व्यक्त केले.

शाळेतर्फे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी डॉ. मोरे यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेचे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सरिता उपासे यांनी केले, तर आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मानले. यावेळी अटल इन्चार्ज बशीर शेख, धनराज तेलंग, सदानंद कुमार, ममता गायकवाड, सोनाली मुसळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Every school should do ‘Miyawaki Forest Creation’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.