चार दिवसांत २०० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:09+5:302021-04-27T04:33:09+5:30

उमरगा : तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याची मोहीम ...

Examination of 200 people in four days | चार दिवसांत २०० जणांची तपासणी

चार दिवसांत २०० जणांची तपासणी

googlenewsNext

उमरगा : तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. यानुसार शहरातील आरोग्य नगर कॉर्नरवर सुरू करण्यात आलेल्या तपासणीत चार दिवसांत २०० लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. त्यामध्ये १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.

तालुक्यात सोमवारी ८१ कोरोनाबाधितांची भर पडली तर तिघांचा मृत्यू झाला. सध्या ६६४ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत ११७ रुग्णांचा मृत्यू झाला शिवाय २ हजार ८८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात दुसऱ्या लाटेत दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबधितांची भर पडत आहे शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. अशांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने या लोकांची अँटिजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी दोन पोलीस, दोन होमगार्ड, आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी, नगरपालिकेचे २ कर्मचारी, तहसील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी आशा ५३ मोकाट लोकांना पकडून त्यांची टेस्ट केली असता ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या. शुक्रवारी ४७ लोकांच्या तपासणी दोघे तर रविवारी ५० जणांच्या तपासणीत आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळले. सोमवारी देखील ५० लोकांची चाचणी करण्यात आली. यातून ८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोकाट फिरणाऱ्यांची संख्या रोडावत आहे.

तिघांचा मृत्यू

येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात काळ निंबाळा, मुळज आणि तुरोरी येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात १००, ईदगाह सेंटरमध्ये १९, खासगी रुग्णालयात ११५ तर होम आयसोलेशनमध्ये २०६ रुग्ण असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे यांनी दिली.

Web Title: Examination of 200 people in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.