‘उत्पादन शुल्क’चा हाॅटेल वाडावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:54+5:302021-05-29T04:24:54+5:30
उस्मानाबाद -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद व लातूरच्या भरारी पथकाने २८ मे राेजी कळंब तालुक्यातील माेहा येथील वाडा हाॅटेलवर ...
उस्मानाबाद -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद व लातूरच्या भरारी पथकाने २८ मे राेजी कळंब तालुक्यातील माेहा येथील वाडा हाॅटेलवर छापा मारला. या कारवाईत सुमारे १ लाख १० हजार ८८० रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली आहे.
माेहा येथील सुरजकुमार शामकांत झाेरी हा वाडा हाॅटेलवर अवैधरीत्या देशी तसेच विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे २८ मे राेजी पथकाने अचानक छापा मारला. या कारवाईत विदेशी दारूच्या ५२८ बाटल्या व देशी दारूच्या ४८० बाटल्या असा एकूण १ लाख १० हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आराेपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (इ), ८१ व ८३ नुकसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. ए. शेख, लातूर-उस्मानाबादचे भरारी पथक, दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे, आर. आर. गिरी, जवान एम. पी.कंकाळ, व्ही. आय. चव्हाण यांच्या पथकाकडून करण्यात आली. दरम्यान, जप्त केलेला दारूचा साठा नेमका काेणाला विक्री केला जाणार हाेता, याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शाेध घेण्यात येत आहे.