कार्यमुक्ती प्रस्तावावर केली बनावट स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:31 AM2021-09-13T04:31:39+5:302021-09-13T04:31:39+5:30

उस्मानाबाद - येथील नाईक मागास समाज सेवा मंडळात नाेकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, यासाठी सेवापुस्तिका नष्ट ...

Fake signature on dismissal proposal | कार्यमुक्ती प्रस्तावावर केली बनावट स्वाक्षरी

कार्यमुक्ती प्रस्तावावर केली बनावट स्वाक्षरी

googlenewsNext

उस्मानाबाद - येथील नाईक मागास समाज सेवा मंडळात नाेकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, यासाठी सेवापुस्तिका नष्ट करून कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केली. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी दाेघांविरुद्ध नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नळदुर्ग येथील सुरेश माधव नकाते (मृत) हे गावातीलच नाईक मागास समाज सेवा मंडळात नाेकरीस हाेते. त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, या वाईट उद्देशाने त्यांची सेवापुस्तिका संंस्थेतील वैभव व अमाेल विठ्ठल जाधव या दाेघा बंधूंनी नष्ट केली. तसेच १ डिसेंबर २०२० राेजीच्या कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर सुरेश नकाते यांची बनावट स्वाक्षरी केली, अशी फिर्याद मृताची पत्नी सुलभा नकाते यांनी ११ सप्टेंबर राेजी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी संबंधित दाेघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fake signature on dismissal proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.