सोनारी येथील पाझर तलावाची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:42+5:302021-07-24T04:19:42+5:30

सोनारी : परंडा तालुक्यातील साेनारी येथील पाझर तलावाच्या पिचिंगच्या दगडी बांधकामाची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाला लागून असलेल्या घरांना ...

The fall of Pazhar Lake at Sonari | सोनारी येथील पाझर तलावाची पडझड

सोनारी येथील पाझर तलावाची पडझड

googlenewsNext

सोनारी : परंडा तालुक्यातील साेनारी येथील पाझर तलावाच्या पिचिंगच्या दगडी बांधकामाची पडझड झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाला लागून असलेल्या घरांना धाेका निर्माण झाला आहे. असे असतानाही लघू पाटबंधारे विभाग ढुंकूनही पाहायला राजी नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

साेनारी येथे १९९४ मध्ये पाझर तलाव निर्माण करण्यात आला. ०.०५ दलघमी एवढी या तलावाची साठवण क्षमता आहे. मात्र, मागील २८ वर्षांच्या कालखंडात प्रकल्पाची एकदाही दुरुस्ती झालेली नाही. डागडुजीकडे वेळाेवेळी कानाडाेळा झाल्याने आजघडीला प्रकल्पाची माेठ्या प्रमाणात पडझड झाली आहेत. तलावाचा सांडवा फुटला असल्याने, सांडव्याची भिंतही बांधण्याची गरज आहे. हे थाेडके म्हणून की काय, तलावाच्या भरावावर झुडपे वाढली आहेत. या झुडपांमुळे तलावाच्या भरावास धाेका निर्माण झाला आहे, तसेच दगडी पिचिंगचीही पडझड झाली आहे. त्यामुळे तलावाला लागून वास्तव्यास असलेली कुटुंबे सध्या भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत, परंतु आजवर पाटबंधारे विभागाने ढुंकूनही पाहिलेले नाही. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काेट...

मी या विभागात नवीन आहे. चार्ज घेऊन आठ ते दहा दिवसच झाले आहेत. लवकरच साेनारी पाझर तलावाची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर याेग्य ती उपायाेजना केली जाईल.

- एस.डी. बारसकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, परंडा.

साेनारी तलावाच्या भरावाला लागूनच माझे घर आहे. मागील अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. मात्र, सध्या या प्रकल्पाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास धाेका निर्माण हाेऊ शकताे.

- दीपक सुरवसे, ग्रामस्थ, सोनारी.

Web Title: The fall of Pazhar Lake at Sonari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.