उस्मानाबादेत कौटुंबिक वादाची किनार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:34 AM2019-04-17T04:34:59+5:302019-04-19T15:53:49+5:30
राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे नात्याने चुलत भाऊ. मात्र, त्यांच्या कुटुंबातील वैर जगजाहीर आहे.
उस्मानाबाद मतदारसंघात यावेळी १४ उमेदवार रिंगणात आहेत़ गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची जोरदार चुरस रंगली़ राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे नात्याने चुलत भाऊ. मात्र, त्यांच्या कुटुंबातील वैर जगजाहीर आहे. निवडणूक प्रचारातही दिसून आले.
>पाच वर्षांत शिवसेनेने काय केले?
महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. पाच वर्षे सेनेकडे सत्ता, उद्योगमंत्री, पालकमंत्री अशी पदे असतानाही उस्मानाबादेत एकही रोजगार देणारा प्रकल्प झाला नसल्याचा मुद्दा त्यांनी विशेषत्वाने मांडला पाणी, रोजगार, एमआयडीसी, शेतीच्या प्रश्नावर प्रचारात भर दिला.
३०-३५ वर्षांत काय दिले?
शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी प्रामुख्याने विरोधकांनी त्यांच्या दीर्घ सत्ताकाळात उस्मानाबादला काय दिले? हा मुद्दा उचलून धरला़ तेरणा कारखाना व इतर सहकारी संस्था बुडविल्या, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला़ नरेंद्र मोदी यांची कामगिरी ते प्रकर्षाने मांडत होते़ पाणी व रोजगाराचा मुद्दा सोडविण्यावर भर दिला़
हेही रिंगणात
प्रमुख दोघांसह वंचित आघाडीचे अर्जुन सलगर, बसपाचे डॉ़शिवाजी ओमन, आण्णासाहेब राठोड, दीपक ताटे, विश्वनाथ फुलसुरे, आर्यनराजे शिंदे, नेताजी गोरे, जगन्नाथ मुंडे, तुकाराम गंगावणे, वसंत मुंडे, शंकर गायकवाड, सय्यद सुलतान हेही रिंगणात आहेत़