२१ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:34 AM2021-03-23T04:34:29+5:302021-03-23T04:34:29+5:30

उस्मानाबाद तालुक्यामधील कोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी ...

Family Welfare Surgery on 21 Women | २१ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

२१ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

googlenewsNext

उस्मानाबाद तालुक्यामधील कोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे आणि जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. किसन लोमटे यांनी शिबिराचे आयोजन केले. कोरोनाच्या अनुषंगाने विशेष खबरदारी म्हणून शस्त्रक्रियेसाठी दाखल सर्व महिलांची एक दिवस आधी कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. पुणे येथील राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालयातून एकावेळी शिबिरातून ३० शस्त्रक्रिया करण्याची कमाल मर्यादेनुसार कोंड येथे २१ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. बंदखडके यांनी या शस्त्रक्रिया केल्या. शिबिर आयोजनासाठी आरोग्य केंद्रामधील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Family Welfare Surgery on 21 Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.