कर्जबाजारीपणाला कंटाळून भूम तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 19:43 IST2019-03-15T19:42:26+5:302019-03-15T19:43:28+5:30
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सदरील कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते

कर्जबाजारीपणाला कंटाळून भूम तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
भूम (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील कासारी येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबजारीपणाल कंटाळून विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली.
कासारी येथील भास्कर गोपाळ पाटूळे (वय ६५) यांच्याकडे सोसायटीचे कर्ज होते. सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सदरील कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते. मागील काही महिन्यांपासून ते याच विवंचनेत होते. यातूनच पाटूळे यांनी बुधवारी रात्री विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही धटना उघडकीस आली. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मुलगा रोजगारासाठी पुण्यात...
पाटूळे यांना केवळ दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतून उदरनिर्वाहापुरतेही पिकले नाही. त्यामुळे पाटूळे यांच्या २६ वर्षीय मुलाने पत्नीसह काही महिन्यांपूर्वीच रोजगारासाठी पुणे गाठले आहे.