पीक विम्यासाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जमिनीत गाढून घेतले

By बाबुराव चव्हाण | Published: March 1, 2023 12:18 PM2023-03-01T12:18:46+5:302023-03-01T12:19:34+5:30

जनहित शेतकरी संघटना आक्रमक; प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

Farmers aggressive in Dharashiv for crop insurance; Planted in the ground | पीक विम्यासाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जमिनीत गाढून घेतले

पीक विम्यासाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जमिनीत गाढून घेतले

googlenewsNext

धाराशिव : पीकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान देण्याच्या बाबतीत राज्य सरकारकडून वेळकाढूपणाचे धाेरण स्वीकारले जात असल्याचा आराेप करीत बुधवारी साेनेगाव येथे संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला जमिनीमध्ये गाढून घेत आंदाेलन केले. या आंदाेलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमाेल जाधव यांनी केले.

पीक विमा भरूनही शेतकर्यांना हक्काची भरपाई मिळाली नाही. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे पिकाचे अताेनात नुकसान झाले. या नुकसानीच्या अनुदानाचा पत्ता नाही. प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने वेळाेवेळी आंदाेलनेही केली. मात्र, त्याचाही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही, असा आराेप करीत बुधवारी धाराशिव तालुक्यातील साेनेगावात संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला छातीपर्यंत जमिनीत गाढून घेत आंदाेलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सरकारवर हल्लाबाेल केला. दरम्यान, यानंतरही न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू, अशी भूमिकाही जाधव यांनी आंदाेलनावेळी मांडली.

Web Title: Farmers aggressive in Dharashiv for crop insurance; Planted in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.