शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 05:48 AM2020-01-22T05:48:40+5:302020-01-22T05:49:11+5:30

साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात...

Farmer's Doter wrote letter to the chief minister | शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

googlenewsNext

- बालाजी अडसूळ
कळंब (जि़ उस्मानाबाद) : कडकनाथ घोटाळ्याची झळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसलेली आहे़ याच घोटाळ्यात फसलेल्या कळंब तालुक्यातील देवळालीतील एका शेतकºयाच्या तोंडून दररोज मरणाची भाषा ऐकणाºया त्याच्या तिसरीतील कन्येने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. 

धनश्री आश्रूबा बिक्कड असे तिचे नाव आहे. देवळाली जि. प. शाळेत तिसरीच्या वर्गात धनश्री शिकते. शिक्षक मारूती खुडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना शुभेच्छापत्र लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. धनश्रीने थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छापत्र लिहिले होते. यात कष्टकरी बापाची निसर्ग व व्यवस्थेने कशी झोप उडवली आहे, हे तिने मांडले आहे. हे पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले.

धनश्रीचे वडील आश्रूबा बिक्कड यांची कडकनाथ घोटाळ्यात फसगत झाली आहे. वडील मरणाची भाषा करीत असल्याने आपणास भीती वाटते, कडकनाथ घोटाळ्यात अडकलेले पैसे मिळवून देण्याची विनंती तिने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़

पप्पा टेन्शनमध्ये असतात
धनश्री लिहिते, ‘‘साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात. चिडचिड करतात. मम्मीवर रागावतात, माझ्यावरही चिडतात. यापेक्षा मरण बरं म्हणतात़ आमच्या शाळेत पेपर येतो, तो आम्ही वाचतो. यात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या असतात. त्यामुळे लयं, लयं घाबरायला येते.’’
 

Web Title: Farmer's Doter wrote letter to the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.