पवनचक्की कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:35+5:302021-09-03T04:34:35+5:30
यावेळी उपोषणकर्ते शेतकरी म्हणाले, करार न करता तसेच बनावट दस्त नोंदवून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीने पवनचक्कीचे विद्युत पोल उभारून ...
यावेळी उपोषणकर्ते शेतकरी म्हणाले, करार न करता तसेच बनावट दस्त नोंदवून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीने पवनचक्कीचे विद्युत पोल उभारून विद्युत वाहिनी नेली आहे. तसेच काहींना पैशाचे आमिष दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून शेतात पवनचक्की पोल उभे केले आहेत. जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांच्या शेतात सहा हजार पोल उभारले आहेत. काही शेतकऱ्यांना विद्युत पोलसाठी ७५ हजार रुपये देण्यात आले, तर कोणाला १ ते ५ हजार रुपये दिले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारल्यास उलट शेतकऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी ८ जुलै रोजी शेतकरी व कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे उपोषणास बसावे लागल्याचे शेतकरी म्हणाले. न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.