खंडित विजेमुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:04+5:302021-02-15T04:29:04+5:30
शहरातील काळी आई या शिवारात ज्वारी हे पीक जोमात असून, काही ठिकाणी हुरडा झाला आहे, तर काही ठिकाणी कणीस ...
शहरातील काळी आई या शिवारात ज्वारी हे पीक जोमात असून, काही ठिकाणी हुरडा झाला आहे, तर काही ठिकाणी कणीस भरणे चालू आहे. कणीस चांगल्या प्रकारे भरावे व ज्वारी पिकास चांगला उतारा मिळावा यासाठी शेतकरी हातातले काम सोडून शेतात लाइट असेल त्या वेळेत पिकाला पाणी देण्यासाठी जात आहेत. परंतु येथे गेल्यानंतर लाइट ट्रीप होत असल्याने पाणी देण्यात अडचण येत आहे. यानंतर वीज सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागत असून, यात वेळ वाया जात आहे. शिवाय, वीज बंद झाल्यानंतर ती पुन्हा कधी सुरू होणार याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात फोन केल्यानंतर तेथील कर्मचारी अगोदर ग्राहक क्रमांकाची विचारणा करीत असल्याचे शेतकरी नजीर पठाण यांनी सांगितले. याबाबत ऑपरेटर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विचारणा करणारे शेतकरी हे खरेच वीज ग्राहक आहेत की नाहीत, हे कळण्यासाठी आम्ही ग्राहक क्रमांक विचारतो.