विविध मागण्यांसाठी फकिरा ब्रिगेडचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:34 AM2021-02-11T04:34:44+5:302021-02-11T04:34:44+5:30
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले, लोहारा तालुक्यातील करजगाव येथील ६५ वर्षीय वृद्धास मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ॲट्रोसिटीअंतर्गत ...
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले, लोहारा तालुक्यातील करजगाव येथील ६५ वर्षीय वृद्धास मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे, तरीही आरोपीस अटक झालेली नाही, तसेच येळी येथील ७ महिन्यांच्या गर्भवती लखमी राम कांबळे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून कुटुंबास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, पोलीस यंत्रणेकडून व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. वृद्धास मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यावी, यावेळी येथील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. मागण्या मान्य झाल्याशिवाय, उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्ते फकिरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग सरवदे, राम कांबळे, नागिन थोरात, रामदास देडे, नितीन गवळी, अण्णासाहेब क्षीरसागर यांनी घेतला आहे.