तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न; पवनचक्कीच्या वादातून कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 10:51 IST2024-12-27T10:50:39+5:302024-12-27T10:51:09+5:30

धाराशिव जिल्ह्यातील एका गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

Fatal attack on sarpanch in Tuljapur, attempt to burn car by pouring petrol act over windmill dispute | तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न; पवनचक्कीच्या वादातून कृत्य

तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न; पवनचक्कीच्या वादातून कृत्य

काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले होते. ही घटना ताजी असताना आता धाराशीव जिल्ह्यातील एका गावातील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. 

डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त

मिळालेली माहिती अशी, धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा या गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला. गुरुवारी रात्री उशीरा गुंडांनी त्यांच्या कारवर हल्ला केला.  निकम हे बारुळ गावातून मेसाई जवळगा गावाच्या दिशेने येत होते. त्यावेळी काही गुंडांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. सुरुवातील त्यांच्या कारवर अंडी फेकली. त्यांनंतर काचा फोडण्यात आल्या. यानंतर त्यांच्या कारवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला. 

या हल्ल्यात सरपंच निकम थोडक्यात बचावले. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती सोबत होता. तो व्यक्तीही जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. या घटनमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Fatal attack on sarpanch in Tuljapur, attempt to burn car by pouring petrol act over windmill dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.