लग्नकार्यास सहकुटुंब जाणे भाेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:28+5:302021-07-14T04:37:28+5:30
उस्मानाबाद : काेराेनाचा संसर्ग काही अंशी कमी झाला आहे. मात्र, धाेका अद्याप टळलेला नाही. असे असतानाही अनेक मंडळी काेरोना ...
उस्मानाबाद : काेराेनाचा संसर्ग काही अंशी कमी झाला आहे. मात्र, धाेका अद्याप टळलेला नाही. असे असतानाही अनेक मंडळी काेरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याप्रमाणे वावरत आहेत. यातून धाेका बळावू लागला आहे. तुळजापूर तालुक्यातील केळेगाव येथील एका कुटुंबाने सहपरिवार लग्नकार्यास हजेरी लावली हाेती. साेहळ्याहून परतल्यानंतर काहींना त्रास हाेऊ लागला. यानंतर संबंधितांची काेविड टेस्ट केली असता, संबंधित कुटुंबातील ११ जण पाॅझिटिव्ह आले आहेत.
शासन तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययाेजनानंतर दुसऱ्या लाटेचा जाेर ओसरला हाेता. त्यामुळे निर्बंध काही अंशी शिथिल केले आहेत. हीच संधी साधत अनेक मंडळी बेफिकीर हाेऊन वावरत आहेत. काही जण तर मास्कचा वापर टाळू लागले आहेत. त्यामुळेच की काय, मागील पाच-सहा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील केळेगाव येथील एक कुटुंब लग्नकार्यासाठी गेले हाेते. हा साेहळा आटाेपून हे कुटुंब घरी परतल्यानंतर काहींना त्रास हाेऊ लागला. काेराेनासदृश्य लक्षणे असल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली. सर्वांची चाचणी केली असता, संबंधित एकाच कुटुंबातील ११ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. ही माहिती मिळताच आराेग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांच्या संपर्कातील ५९ जणांची टेस्ट केली. यापैकी आणखी ७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. हा धाेका लक्षात घेता, नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आराेग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.