जादा दराने खत विक्री, तीन दुकानदारांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:10+5:302021-05-22T04:30:10+5:30

तुळजापूर तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज, नळदुर्ग, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र, मुर्टा, संघवी शेती उद्योग, नळदुर्ग या खत विक्री ...

Fertilizer sales at exorbitant rates, licenses of three shopkeepers suspended | जादा दराने खत विक्री, तीन दुकानदारांचे परवाने निलंबित

जादा दराने खत विक्री, तीन दुकानदारांचे परवाने निलंबित

googlenewsNext

तुळजापूर तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज, नळदुर्ग, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र, मुर्टा, संघवी शेती उद्योग, नळदुर्ग या खत विक्री केंद्राने खताच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकर्यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र-गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक,दरफलकावर नोंद न करणे यासारखे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही घाटगे यांनी दिला आहे.

चाैकट...

शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धता व दराबाबत काही अडचण वा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करता येणार आहे. एवढेच नाही तर फाेनवर तक्रार देता यावी, यासाठी ०२४७२-२२३७९४ हा संपर्क क्रमांक उपलब्ध दिला आहे. या सुविधेचा अन्यायग्रस्त शेतक्यांनी उपयाेग करावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Fertilizer sales at exorbitant rates, licenses of three shopkeepers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.