जादा दराने खत विक्री, तिघांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:20+5:302021-06-05T04:24:20+5:30

रासायनिक खताची सुधारित दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने ...

Fertilizer sales at exorbitant rates, licenses of three suspended | जादा दराने खत विक्री, तिघांचे परवाने निलंबित

जादा दराने खत विक्री, तिघांचे परवाने निलंबित

googlenewsNext

रासायनिक खताची सुधारित दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने तुळजापूर व उमरगा परिसरातील तपासणी करून तीन खत विक्रत्यांचे परवाने रद्द केले.

कृषी विभागाने खत विक्रेत्यांना सुधारित दर निश्चित केले आहेत. मात्र, असे असताना अनेक ठिकाणी काही खत विक्रेते जादा दराने खताची विक्री करीत आहेत. अशा विक्रेत्यांना चाप बसावा, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ९ भरारी पथके स्थापन केली आहेत. मागील दोन दिवस तुळजापूर व उमरगा परिसरात पथकाने खत विक्री केंद्राची तपासणी मोहीम राबवली होती. यावेळी तुळजापूर शहरातील कृष्णा एजन्सी, उमरगा येथील विशाल कृषी एजन्सी व विशाल कृषी एजन्सी ही खत विक्री केंद्र रासायनिक खताची सुधारित दरापेक्षा जादा दराने विक्री करताना आढळून आली. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सुधारित दरापेक्षा जादा दराने खताची विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र, गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक, दरफलकावर नोंद न करणे आदी प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिकारी उमेश घाटगे यांनी दिला.

Web Title: Fertilizer sales at exorbitant rates, licenses of three suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.