बॅटरीच्या साह्याने पंधरा मिनिटे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:30 AM2020-12-22T04:30:05+5:302020-12-22T04:30:05+5:30
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोहारा तालुक्यातील पिकांचे व जमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीनच्या बनमी पाण्यात वाहून गेल्या. जमिनी ...
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोहारा तालुक्यातील पिकांचे व जमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीनच्या बनमी पाण्यात वाहून गेल्या. जमिनी खरडून गेल्या. पिके पाण्यात कुजून गेली. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी सकाळी अकरा वाजता सास्तूर व राजेगाव येथे येणार होते. त्यामुळे सकाळपासूनच शेतकरी, अधिकारी, कर्मचारी पथकाची वाट पहात थांबले होते. दुपारपर्यंतही पथक न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी काढता पाय घेत घेतला. अखेर तब्बल आठ तासांनी रात्री पावणेसात वाजता हे पथक दाखल झाले. त्यांनी माकणी ते सास्तूर रस्त्यावरील सास्तूर - चिंचोली ओढ्याची व बाजुच्या जमिनिची बॅटऱ्यांच्या सहाय्याने पहाणी केली केली. यावेळी राहुल पाटील, दत्तात्रय सुतार यांनी पथकांसमोर व्यथा मांडली. तसेच नुकसाचे फोटोही पथकांने पाहिले.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी तहसीलदार रोहन काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, के. डी. निबाळकर, दीपक जाधव, डी. आय. गोरे, एम. टी. जगताप, रब्बानी नळेगावकर, कोकाटे आदी उपस्थित होते.