सलग पाचव्यांदा आली महिलेच्या हाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:28 AM2021-02-15T04:28:42+5:302021-02-15T04:28:42+5:30
आंदोरा ग्रामपंचायत : रेखा शिंदे, वर्षा कांबळे यांची वर्णीआंदोरा : परंडा तालुक्यातील आंदोरा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले असून, ...
आंदोरा ग्रामपंचायत : रेखा शिंदे, वर्षा कांबळे यांची वर्णीआंदोरा : परंडा तालुक्यातील आंदोरा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले असून, सरपंचपदी रेखा दयानंद शिंदे तर उपसरपंचपदी वर्षा महावीर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीवर यंदा सलग पाचव्यांदा सरपंच पदाचा मान महिलेला मिळाला असून, यापूर्वी सुवर्णमाला शिंदे, सविता कांबळे, दैवशाला शिंदे व उर्मिला शिंदे यांनी हे पद भूषविले आहे.
आंदोरा-आंदोरी ग्रामपंचायत निवडणुकीत शहाजी मारूती बारस्कर व संगिता सुरेश बारसकर हे दोन सदस्य बिनविरोध आले होते. यामुळे पाच जागांसाठी निवडणूक झाली. या सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यातही रेखा शिंदे या दोन ठिकाणाहून निवडून आल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया अध्यासी अधिकारी एस. आय. सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना ग्रामसेवक ए. एस. बारगुळे यांनी सहकार्य केले. यावेळी रेखा शिंदे व वर्षा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी नूतन सदस्य दैवशाला शिंदे, अतुल सोलनकर, शहाजी बारसकर, संगिता बारसकर यांच्यासह पॅनल प्रमुख दयानंद शिंदे, ॲड. नितीन शिंदे, तुकाराम गोरे, लिंबराज शिंदे, गुलचंद सोलनकर, श्रीमंत गोफणे, हणमंत गोफणे, रामराजा सोलनकर, अंगद बारसकर, सिध्देश्वर वाघमारे, कोळेकर आदी उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच, ुपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.