Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले

By बाबुराव चव्हाण | Published: May 15, 2023 01:18 PM2023-05-15T13:18:35+5:302023-05-15T13:21:10+5:30

गाेडाऊनमध्ये माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टाॅक करण्यात आला हाेता. त्यामुळे आग लागताच फटाक्यांचे आवाज हाेऊ लागले.

fire in firecrackers warehouse at Terkheda; 14 workers were saved by getting out in time | Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले

Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले

googlenewsNext

तेरखेडा (जि. धाराशिव) -वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाक्याच्या गाेडाऊनला आज सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आतील तेरा ते चाैदा महिला तसेच पुरूष कामगार वेळीच बाहेर पडल्याने ते बालंबाल बचावले. मात्र, एक व्यक्ती जखमी झाली असून त्यास उपचारासाठी तेरखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले आहे.

तेरखेडा येथील बसस्टॅन्डपासून अवघ्या काही अंतरावर भलेमाेठे फटाक्यांचे गाेडाऊन आहे. याच गाेडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके तयार करून स्टाॅक करून ठेवला जाताे. दरम्यान, याच गाेडाऊनला साेमवारी सकाळी साधारपणे पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आतील महिला तसेच पुरूष कामगार प्रसंगावधान बाळगत गाेडाऊनबाहेर बाहेर पडले. मात्र, एक व्यक्ती जखमी झाली आहे. संबंधितास तातडीने तेरखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ताेवर धाराशिव पालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत संपूर्ण गाेडाऊन जळून भस्म झाले.

धुराचे लाेट अन् बघ्यांची गर्दी...
गाेडाऊनमध्ये माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टाॅक करण्यात आला हाेता. त्यामुळे आग लागताच फटाक्यांचे आवाज हाेऊ लागले. त्यामुळे गाेडाऊन परिसरात प्रचंड धूर निर्माण झाला हाेता. आकाशात अक्षरशा धुराचे लाेट पहावयास मिळत हाेते. दरम्यान, फटाक्यांचे आवाज ऐकून ग्रामस्थांनी परिसरात माेठी गर्दी केली हाेती.

Web Title: fire in firecrackers warehouse at Terkheda; 14 workers were saved by getting out in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.