उस्मानाबादेत पाच हजाराची लाच घेणारा तलाठी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:05 PM2018-02-26T19:05:42+5:302018-02-26T19:06:00+5:30
कुपनलिकेची सातबार्यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़
उस्मानाबाद : कुपनलिकेची सातबार्यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़ ही कारवाई सोमवारी दुपारी उमरगा शहरातील मळगी सज्जाच्या तलाठी कार्यालयात करण्यात आली़
एका शेतकर्याने त्याच्या शेतातील लिंबूच्या बागेची व कुपनलिकेची सातबार्यावर नोंद घेण्यासाठी, दोन्ही फेरफारच्या नोंदी आॅनलाईन फेरफारला घेऊन तो फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेण्यासाठी मळगी (ता़उमरगा, जि़उस्मानाबाद) सज्जाचे तलाठी नंदकुमार बाबुराव गायकवाड यांच्याकडे रितसर अर्ज केला होता़ या कामासाठी तलाठी नंदकुमार गायकवाड यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार शेतकर्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़.
तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस़आऱजिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे, पोनि बी़जी़आघाव यांनी उमरगा येथील मळगी तलाठी सज्जा कार्यालयाच्या आवारात सोमवारी सापळा रचला़ तक्रारदाराच्या कामासाठी तलाठी नंदकुमार गायकवाड यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोनि बी़जी़आघाव हे करीत आहेत़