श्री संत एकनाथ परिवर्तन पॅनलचा चिंचोली ग्रामपंचायतीवर झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:00+5:302021-02-15T04:29:00+5:30
भूम : तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत श्री संत एकनाथ परिवर्तन पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकत सत्ता काबीज केली. येथील ...
भूम : तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत श्री संत एकनाथ परिवर्तन पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकत सत्ता काबीज केली. येथील सरपंचपदी विद्या बालाजी शिर्के, तर उपसरपंचपदी औदुंबर जेजेराम वारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर गावात जल्लोष करत विजयी उमेदवाराची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या ग्रामपंचायतीवर मागील ३५ वर्षांपासून शिवसेना पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत श्री संत एकनाथ महाराज परिवर्तन पॅनलने आपला झेंडा फडकविला. नूतन सरपंचपदी विद्या शिर्के, उपसरपंचपदी औदुंबर वारे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नूतन सदस्य केशर औदुंबर वारे, काशीबाई आश्रुबा साळुंके, अर्चना रणजित साळुंके, सोनाली भरत शिर्के, प्रवीण सुरेश पवार, श्रीलता संतोष लोखंडे सदस्य उपस्थित होते.
यावेळी दिलीप शिर्के, गौतम वारे, विधिज्ञ रामराजे साळुंके, शिवलिंग शिर्के, सुग्रीव वारे, शिवाजी शिर्के, भीमराव मसाजी वारे, दत्ता पवार, बबन शिर्के, पांडू लोखंडे, पोपट मृदंगे, गुलाब शेख, बाजीराव शेळके, बालाजी वारे, दिगंबर हरिचंद्र वारे, गणेश दिगंबर वारे, शंकर अश्रू वारे, बापुराव जाधव, भास्कर पाळेकर, भय्या पाळेकर, अभिमन्यू वारे, केरबा काळे आदी उपस्थित होते.