मांजरा नदीला पूर, पाणी लगतच्या शेतात घुसले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 01:18 PM2021-09-06T13:18:11+5:302021-09-06T13:21:33+5:30
मागील दिन दिवसात वाशी तसेच भूम तालुक्यास पावसाने झोडपून काढले आहे.
पारगाव/ ईट (जि. उस्मानाबाद) : वाशी तालुक्यातील पारगावसह परिसरात शनिवारी तसेच रविवारी मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात रात्रभर दमदार पाऊस झाला. त्यामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. सातत्याने पाणी पातळीत वाढ होते आहे. हे पाणी आता लगतच्या शेतीत घुसले आहे. संगमेश्वर प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला आहे.
मागील दिन दिवसात वाशी तसेच भूम तालुक्यास पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे संगमेश्वर प्रकल्प रविवारी रात्री ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे मांजर नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे नदीपात्र सकाळपासूनच दुथडी भरून वाहू लागले आहे. पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हे पाणी लगतच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणी अत्यंत वेगाने वाहत असल्याने जनकापूर-मानेवाडी रस्त्यावरील पूल वाहून गेला. पारगाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.