सूचना पाळा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:45 AM2021-02-26T04:45:42+5:302021-02-26T04:45:42+5:30
भूम : कोरोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ...
भूम : कोरोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने बुधवारी डॉक्टर्स व व्यापाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत दिला.
उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामीण भागातील डॉक्टर्स तसेच शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापर होत नसल्याने प्रत्येकाने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस तालुक्यातील सर्व डॉक्टर, व्यापारी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे आदी उपस्थित होते.