काेराेना घालविण्यासाठी नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:04+5:302021-05-05T04:53:04+5:30
सीईओ डाॅ. फड : घाटंग्री गावास भेट देऊन घेतला आढावा उस्मानाबाद : कोरोना विषाणूमुळे होत असलेला संसर्ग तोपर्यंत थांबणार ...
सीईओ डाॅ. फड : घाटंग्री गावास भेट देऊन घेतला आढावा
उस्मानाबाद : कोरोना विषाणूमुळे होत असलेला संसर्ग तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत आपण नियमांचे पालन करणार नाही. अर्थात, कोरोनाला घालविण्यासाठी आपणा सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री ग्रामपंचायतीला भेट देऊन उपायाेजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी गटविकास अधिकारी दीवाने, सुरेश तायडे, गट शिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार, डॉ. किरण गरड, सरपंच, उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
सीईओ डाॅ. फड म्हणाले की, इतर जिल्ह्यांप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या संसर्गाला वाढू देण्यास आपणच जबाबदार आहोत. कारण आपण कोरोनाच्या अनुषंगाने पाळावयाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहोत. आपले दुर्लक्ष कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. जोपर्यंत आपण सामाजिक अंतर, मास्क, स्वच्छता आदी नियमांचे पालन करणार नाही त्याचबरोबर कसलाही आजार, खोकला, ताप, सर्दी झाकून ठेवणार नाही किंवा अंगावर काढण्याचे बंद करणार नाही, तोपर्यंत कोरोना आपल्यामध्ये राहणार आहे. आपण सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे ठरवून नियम पाळू लागलो तर कोरोना आपोआप निघून जाईल. कोरोनाला घालवून देण्याची तुम्हा-आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असे डाॅ. फड म्हणाले. याप्रसंगी गावचे पाेलीस पाटील, डॉक्टर, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती हाेती.