लाेहारा तहसीलसमाेर अन्नत्याग आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 03:08 PM2022-08-10T15:08:33+5:302022-08-10T15:08:41+5:30
संभाजी ब्रिगेड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या
लोहारा (जि. उस्मानाबाद) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.
मराठा समाजाला आरक्षण त्वरित मिळावे यावी, यासाठी टाईम बॉण्ड धोरण आखावे, आरक्षण मिळेपर्यंत ई. डब्ल्यू. एस आरक्षणाचा लाभ सुरू ठेवण्यात यावा, सारथी संस्थेला व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधीची तरतूद करण्यात यावी, मागेल त्याला शिक्षण देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयासमाेर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यानंतरही उपराेक्त प्रश्न सुटले नाहीत तर अधिक तीव्र आंदाेलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश गोरे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद पवार, जिल्हा सचिव आशिष पाटील, गगांराम भोंडवे, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना हासुरे, प्रतिभा परसे, तानाजी पाटील, भरत पाटील, सुशांत शिंदे, बळीराम धारुळे, आतुलराजे सोमवंशी, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील, प्रशांत काळे, परमेश्र्वर जाधव, गणेश फत्तेपुरे, नितीन गोरे, भरत मुगंळे, प्रवीन कदम, आकाश ऐरनुळे आदी सहभागी झाले हाेते.