‘जागरी’ असोसिएशनची कार्यकारणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:31+5:302021-07-14T04:37:31+5:30

उस्मानाबाद : देशातील सर्व गूळ कारखान्यांच्या संचालकांची बैठक १० जुलै रोजी इंदापूर येथे सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या ...

Formed the executive of ‘Jagari’ Association | ‘जागरी’ असोसिएशनची कार्यकारणी गठित

‘जागरी’ असोसिएशनची कार्यकारणी गठित

googlenewsNext

उस्मानाबाद : देशातील सर्व गूळ कारखान्यांच्या संचालकांची बैठक १० जुलै रोजी इंदापूर येथे सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात सर्व कारखान्यांच्या संचालकांच्या संमतीने अखिल भारतीय जागरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने अध्यक्ष, रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड कार्याध्यक्ष, डी. डी. एन. कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय नाडे, सातारा येथील वर्धन शुगर्सचे चेअरमन धैर्यशील कदम, नांदेड येथील मारोतराव कवळे उपाध्यक्ष तर सचिवपदी श्री सिध्दीविनायक उद्योग समूहाचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी कोल्हापूर येथील घोडावत फुड्सचे सुनील शहा व कोषाध्यक्ष पदी गुळमेश्वर ॲग्रोचे चेअरमन बापूराव चव्हाण यांची निवड झाली. उर्वरित सर्व सदस्यांची असोसिएशनचे संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय जागरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे प्रश्न घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचे ठरले.

Web Title: Formed the executive of ‘Jagari’ Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.