माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संमेलनाचे निमंत्रणच आले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:54 AM2020-01-10T05:54:31+5:302020-01-10T05:54:46+5:30

संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय.

Former inaugural Vaishali Yede has not received an invitation to the meeting! | माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संमेलनाचे निमंत्रणच आले नाही!

माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संमेलनाचे निमंत्रणच आले नाही!

googlenewsNext

स्नेहा मोरे 
संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ‘माहा याच जलमावर विश्वास हाय. म्हून मी याच जन्मी लढीन अन् वायद्याची शेती फायद्यात आणीन म्हनून लढत हावो़़़ रडत नाही, लढत हाव !’ या शब्दांत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिका बजाविणाऱ्या वैशाली येडे यांना यंदाच्या साहित्य संमेलनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी असणाºया या माजी उद्घाटक वैशाली येडे यांना संयोजकांनी आमंत्रणच दिलेले नाही.
‘अभावात जगणाºयाले भाव भेटावं’ या शब्दांत यवतमाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैशाली येडे यांनी यवतमाळात झालेल्या संमेलनाच्या व्यासपीठावरुन मनोगत व्यक्त केले होते. त्या अंगणवाडी सेविका असून, त्यांच्या पतीने आठ वर्षांपूर्वी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन मुलांचा सांभाळ त्या करीत आहेत. याशिवाय ‘तेरव’ या नाटकातील भूमिकेतून त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांच्या वेदनाही समोर आणल्या आहेत.
‘‘संमेलनाला यायला आवडले असते़ मात्र संयोजकांनी याविषयी काही कळविले नसल्याने खेद वाटतो,’’ असे वैशालीताईंनी सांगितले.
>ग्रंथदिंडीने आज प्रारंभ
शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य यात्रेला सुरुवात होत आहे़ उद्घाटन दुपारी ४ वाजता ना़धों़महानोर यांच्या हस्ते होणार आहे़
११ वाजता प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ़अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल़

Web Title: Former inaugural Vaishali Yede has not received an invitation to the meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.