चार महिन्यात सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:37+5:302021-02-10T04:32:37+5:30

उस्मानाबाद : गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले. त्यासोबतच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस-सिलिंडरच्या दरातही वाढ होत असून, ...

In four months, the price of a cylinder has gone up by Rs 125 | चार महिन्यात सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

चार महिन्यात सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

googlenewsNext

उस्मानाबाद : गेल्या चार महिन्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले. त्यासोबतच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस-सिलिंडरच्या दरातही वाढ होत असून, मागील चार महिन्यात सिलिंडर १२५ रुपयांनी महागला आहे. यामुळे महिलांचे बजेट कोलमडले आहे. तर पट्रोलच्या दरातही ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ६ रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीचा वाहनधारकांना फटका बसत आहे.

ऑक्टोबर महिन्यापासनू खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यासोबतच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या दरातही गेल्या चार महिन्यापासून वाढ होत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरानेही उच्चांकी पातळी गाठली आहे. दरवाढीच्या या प्रश्नावर विरोधी राजकीय पक्षांनी आंदोलने केलीत. मात्र, सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सध्या तूर कापणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, शेतकरी शहराच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणत आहे. मात्र, डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालक अधिकचे पैसे मागत आहेत.

पेट्राेल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक मालवाहू, वाहनधारक आण कृषीमालाची ने-आण करणारे वाहनचालकांना आर्थिक फटका बसत आहे. मागील चार महिन्यात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ६ रुपयांनी वाढले आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस-सिलिंडरच्या दरात १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य जनतेच आर्थक बजेट कोलमडत आहे.

अशी झाली इंधनवाढ...

पॉईंटर...

दिनांक पेट्रोल डिझेल सिलिंडर

१ नोव्हेंबर ८८.२६ ७६.२४ ६१०

१ डिसेंबर ८९.५४ ७८.३२ ६६०

१ जानेवारी ९०.८४ ८९.८१ ७१०

१ फेब्रुवारी ९३.२९ ८२.४८ ७३५

प्रतिक्रिया...

शासनाने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे वाढवलेले दर आटोक्यात आणण्यासाठी कुठलेच प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

अमोल कांबळे, नागरिक

गॅस सिलिंडरच्या किंमत वाढतेच आहे. चार महिन्यात १२५ रुपयांनी किंमत वाढली आहे. तसेच घरपोच गॅस घेण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात. लॉकडाऊन काळात ५ ते ६ रुपये सबसिडीची रक्कम मिळत तेही आता बंद झाली आहे.

साधना वाघमारे, गृहिणी

लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामाना नागरिकरांना करावा लागला. सध्या उद्योग, व्यवसाय पूर्वदावर येऊ लागले आहेत. अशा स्थितीत पेट्रोलचे दर गगणाला भिडत आहेत. त्यामुळे वाहन वापरेणही कठीण झाले आहे.

मधुकर साखरे, नागरिक

वीजबिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Web Title: In four months, the price of a cylinder has gone up by Rs 125

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.