परांडा तहसीलदारांच्या दालनासमोर मनसेचे ‘बोंबाबोंब’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 06:56 PM2018-10-03T18:56:40+5:302018-10-03T18:57:09+5:30

तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही प्रशासनाने खरीप पिकांची हंगामी आणेवारी ६० पैसवर दाखविली आहे.

In front of the Paranda tehsildar, MNS's 'Bababombab' movement | परांडा तहसीलदारांच्या दालनासमोर मनसेचे ‘बोंबाबोंब’ आंदोलन

परांडा तहसीलदारांच्या दालनासमोर मनसेचे ‘बोंबाबोंब’ आंदोलन

googlenewsNext

परंडा (उस्मानाबाद ) : खरीप पिकांची वस्तुनिष्ठ आणेवारी जाहीर करून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.  

खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडलेला नाही. अर्धा अधिक पावसाळा सरून गेला असतानाही प्रकल्प भरतील असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे रबी पेरणी होते की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. एकूणच तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही प्रशासनाने खरीप पिकांची हंगामी आणेवारी ६० पैसवर दाखविली आहे.

सदरील आणेवारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वस्तुनिष्ठ आणेवारी काढून तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी मनेसेने आज दुपारी तहसीलदारांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, उपाध्यक्ष साबीर शेख, शहराध्यक्ष मुर्तूजा सय्यद,  किशोर गायकवाड, बापूसाहेब क्षीरसागर, जलाल शेख, अक्षय कुलकर्णी, पैगंबर शेख, आदेश शिंदे, सागर जाधव, अविनाश विटकर, दयानंद गायकवाड उपस्थित होते.

Web Title: In front of the Paranda tehsildar, MNS's 'Bababombab' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.