रस्त्यासाठी मिळाला ११ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:37+5:302021-06-06T04:24:37+5:30
मतदारसंघातील अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी, तसेच व्यापारी खरेदीसाठी, तर नागरिक इतर कामांसाठी नेहमीच बार्शीकडे जातात. परंतु, भूम येथून बार्शीकडे ...
मतदारसंघातील अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी, तसेच व्यापारी खरेदीसाठी, तर नागरिक इतर कामांसाठी नेहमीच बार्शीकडे जातात. परंतु, भूम येथून बार्शीकडे जाण्यासाठी एकही मार्ग खड्डेमुक्त नसल्याने नागरिकांना दणक्यात प्रवास करावा लागत आहे. यामुळे कित्येक नागरिकांना वेगवेगळे आजारदेखील जडले आहेत. वेळेत रुग्णांना उपचार न मिळाल्याने काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. यामुळे बार्शीकडे जाण्यासाठी एक तरी रस्ता चांगला असावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.
ही बाब गांभीर्याने घेत आ. तानाजी सावंत यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भूम ते तांबेवाडी १५ किलोमीटर रस्त्याची मागणी सातत्याने लावून धरली. अखेर या मागणीस यश आले असून, ३ कोटी ९६ लाख निधी या रस्त्याच्या कामास मंजूर झाला आहे. तसेच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून ७ कोटी २० लाख रुपये बजेटची तरतूद करण्यात आल्यामुळे या कामाला अजून गती मिळणार आहे. अरसोली-देवळाली यापेक्षाही जवळचा मार्ग तांबेवाडी हा असल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, विशेषत: रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याासठी हा रस्ता उपयोगी ठरणार असल्याने काम वेळेत व दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.