रस्त्यासाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:33+5:302021-04-04T04:33:33+5:30
फळांना मागणी उस्मानाबाद : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अन् दुसरीकडे दिवसेंदिवस तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. उन्हापासून बचावासाठी विविध ...
फळांना मागणी
उस्मानाबाद : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अन् दुसरीकडे दिवसेंदिवस तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच बाजारात द्राक्षे, टरबूज, चिकू, खरबूज, मोसंबी यासारख्या रसदार फळांनादेखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
‘काळजी घ्या’
परंडा : गतवर्षी सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच फिजिकल डिस्टन्स हे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भाजीपाला कवडीमोल
उमरगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व आठवडीबाजारदेखील बंद करण्यात आले आहेत. परंतु, यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला कवडीमोल विकावा लागत आहे.
अवैध धंदे वाढले
उस्मानाबाद : तालुक्याच्या ग्रामीण भागात दारू, मटका, जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. पोलिसांनी याला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.