जुगाराचे साहित्य, राेख रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:47+5:302021-08-28T04:36:47+5:30
पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या उस्मानाबाद : भूम तालुक्यातील तीन मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे साेयाबीन, उडीद, कांदा, ऊस तसेच पालेभाज्यांचे ...
पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या
उस्मानाबाद : भूम तालुक्यातील तीन मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे साेयाबीन, उडीद, कांदा, ऊस तसेच पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी क्रांतिवीर सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तातडीने कार्यवाही न झाल्यास ७ सप्टेंबर राेजी एक दिवसीय उपाेषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी पाटील, गणेश नलवडे, अमृत भाेरे आदींची उपस्थिती हाेती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उस्मानाबाद : तालुक्यातील कावळेवाडी येथे दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे अभियंता नंदकिशाेर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. दिग्गज दापके, डाॅ. बालाजी लाेमटे, नरसिंह पाटील, निहाल काझी, विकास वाघमारे आदींची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कावळे यांनी केले. कार्यक्रमासाठी वैभव खाेत, किरण शिंदे, सतीश कावळे, महादू कावळे, ओम कावळे, ऋषी कावळे, प्रकाश कावळे आदींनी परिश्रम घेतले.