कोविड लसीकरणाचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:27+5:302021-03-14T04:28:27+5:30

उस्मानाबाद : कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ...

The general public should benefit from covid vaccination | कोविड लसीकरणाचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा

कोविड लसीकरणाचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागमार्फत मोफत लस वितरित करण्यात येत असून सर्व नागरिकांनी कोरोनाची लस तत्काळ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील पोहनेर, मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शनिवारी ज्येष्ठ नागरिकांकरिता कोरोनावरील मोफत लस देण्याचा कार्यक्रम अध्यक्षा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पोहनेर येथील लसीकरण सत्रात ८० वर्षांवरील दोन महिलांनी लसीकरण करून घेतले. त्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक आरोग्य केंद्रावर आठवड्यातून दोन वेळेस लस देण्याच्या सूचना कांबळे यांनी आरोग्य विभागास दिलेल्या आहेत.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, पोहनेरच्या सरपंच उपासना धावारे व मंगरुळ सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे, उपसरपंच गिरीष डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, तुळजापूर आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, वैद्यकीय अधिकारी महेश गुरव, डॉ. संतोष पवार, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नळदुर्गात इमारत नाही !

नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अद्याप लसीकरण का सुरू झाले नाही, अशी विचारणा जिल्हा परिषद अध्यक्षांनी यावेळी केली. यावर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव यांनी विविध अडचणी येत असल्याचे नमूद करून लसीकरणासाठी इमारत अद्ययावत नसल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांत लसीकरण सत्र सुरू करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले असून, यासाठी आपणही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रचार व प्रसार होण्याची गरज

लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही गावोगावी याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. गावागावातील निराधार, झोपडपट्ट्या, तांडा वस्ती येथील वयोवृध्द नागरिकांना लसीकरण सत्रास आणण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मदत करण्याची गरज असल्याचे कांबळे यावेळी म्हणाल्या.

Web Title: The general public should benefit from covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.