मातंग समाजाला लाेकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:37 AM2021-08-14T04:37:59+5:302021-08-14T04:37:59+5:30
कळंब : मातंग समाजाचा अद्यापही सर्वांगीण विकास झाला नसल्याने समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड आरक्षण देण्यात यावे, ...
कळंब : मातंग समाजाचा अद्यापही सर्वांगीण विकास झाला नसल्याने समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड आरक्षण देण्यात यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत ज्याप्रमाणे शासनाने योजना सुरू केली आहे, तशाच पद्धतीने मातंग समाजातील कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास सदरील योजना सुरू करण्यात यावी, उस्मानाबाद व कळंब येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा, बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करण्यात यावी, कळंब येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे, मातंग समाजाला स्वतंत्र अ, ब, क, ड आरक्षण मिळावे म्हणून बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील दिवंगत संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली होती, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत व वारसाला शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, जिल्हा सचिव बालाजी उपरे, तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, सचिव बाळासाहेब कांबळे, तालुका संघटक दत्ता झोंबाडे, वाशी तालुका महिला अध्यक्षा आशा शिंदे, संघटक आशा माने, बालाजी शिंदे, आकाश लोंढे, करण मोरे, तिरुपती खंडागळे, शुभम अंगरखे, दीपक खंडागळे, अजय लोखंडे, उत्रेश्र्वर मस्के, विष्णू झोंबाडे, संतोष झोंबाडे आदी उपस्थित हाेते.