दैवाने मिळाले अन् सरकारने काही क्षणात परत घेतले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:09 AM2021-09-02T05:09:19+5:302021-09-02T05:09:19+5:30
पुरवणी देयकांसाठी पुन्हा प्रतीक्षा : लातूरच्या वेतनासाठी सात काेटी काढून घेतले उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील शिक्षकांसह अन्य ...
पुरवणी देयकांसाठी पुन्हा प्रतीक्षा : लातूरच्या वेतनासाठी सात काेटी काढून घेतले
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांची पुरवणी देय्यके मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. यसाठी सुमारे साडेसहा ते सात काेटींची मगणी सरकारकडे करण्यात आली आहे; परंतु ही तरतूद उपलब्ध हाेत नव्हती. मागील महिन्यात वेतन अदायीनंतर सुमारे पावणेसात ते सात काेटी रुपये शिल्लक हाेते. यातून पुरवणी देयके देण्याचा निर्णय घेऊन तशी प्रक्रिया राबविण्यात आली. अवघ्या दाेन दिवसांत पैसे तालुक्यांना वर्ग हाेणार ताेच, शासनाने परत घेतले. लातूरच्या गुरुजींच्या वेतनासाठी निधी नसल्याचे याला कारण देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील गुरुजींच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षा आली आहे.
कुुटुंबातील वा स्वत: दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने दवाखान्याचे बिल शिक्षणकडे पडून आहे. काेणाची फरकाची रक्कम मिळालेली नाही, आदी स्वरूपाची पुरणी देयकांचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे खच पडला आहे. यातील अनेक देयके दाेन-दाेन वर्षांपूर्वीची आहेत. हे पैसे मिळावेत, यासाठी संबंधित शिक्षक वा कर्मचारी शिक्षण विभागाकडे खेटे मारीत आहेत. यापूर्वी यासाठी सुमारे सहा काेटी रुपये मंजूर हाेते; परंतु तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी वेळेत प्रक्रिया केली नाही. त्यामुळे निधी परत गेला, असा आराेप लाभार्थ्यांतून हाेत आहे. दरम्यान, त्यामुळे गुरुजींच्या निशिबी पुन्हा प्रतीक्षा आली हाेती. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षकांच्या वेन अदायीनंतर सुमारे पावणेसात ते सात काेटी रुपये शिल्लक राहिले हाेते. यातून बिले देण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडूप प्रक्रिया राबविण्यात आली हाेती. थाेडाबहुत निधी कमी पडत असल्याने प्रत्येक तालुक्याला दाेन लाख रुपये कमी देत नियाेजन करून काेषागाराकडे निधीच्या अनुषंगाने मागणी केली हाेती. हे पैसे अवघ्या दाेन दिवसांत मिळणार ताेच, शासनाने लातूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे नसल्याचे सांगत जवळपास सात काेटी रुपये वरिष्ठ स्तरावरूनच वळते केले. त्यामुळे पुरवणी देयकांकडे डाेळे लावून बसलेल्या गुरुजींच्या नशिबी पुन्हा निराशा आली आहे. सदरील प्रश्नी शिक्षक भारती तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी नव्याने निधी मागणी करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला आदेशित केले आहे. सध्या काेविडचा काळ असल्याने सरकारच्या तिजाेरीतही खडखडाट आहे. त्यामुळे मागणी नाेंदविली तरी निधी येईल तेव्हा खरे.
चाैकट...
सात काेटी रुपये उपलब्ध हाेऊन बरेच दिवस झाले; परंतु शिक्षण विभागाने वेळेवर प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांनी तातडीने प्रक्रिया राबविली असती तर अन्य जिल्ह्यांना पैसे वळते झाले नसते. त्यामुळे या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
-बशीर तांबाेळी, राज्य नेते, प्राथमिक शिक्षक समिती, उस्मानाबाद.
काेट...
पुरवणी देयकांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया करण्यात आली हाेती. अवघ्या दाेन-तीन दिवसांत निधी तालुकास्तरावर वर्गही झाला असता; परंतु लातूर जिल्ह्यातील गुरुजींच्या वेतनासाठी पैसे शिल्लक नव्हते. परिणामी, शासनाने वरिष्ठस्तरावरून ही रक्कम लातूरसाठी वर्ग करण्यात आली. असे असले तरी आपण शासनाने पुरवणी देयकांसाठी मागणी नाेंदविली आहे.
-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.