गावात जाऊन ‘सीईओं’च्या हस्ते ग्रामसेवकास पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:17+5:302021-06-10T04:22:17+5:30
उस्मानाबाद : आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण जिल्हास्तरावर जंगी कार्यक्रम घेऊन केले जाते; परंतु काेराेनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे ...
उस्मानाबाद : आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण जिल्हास्तरावर जंगी कार्यक्रम घेऊन केले जाते; परंतु काेराेनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या हस्ते संबंधित गावात जाऊन पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने प्रत्येक वर्षी सन्मानित केले जाते.
२०२०-२१ या वर्षातही अशा आठ ग्रामसेवकांना पुरस्कार जाहीर झाला हाेता. जिल्हास्तरावर कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार हाेते; परंतु काेराेनाचे संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. काेराेनाची ही परिस्थिती लक्षात घेऊन थेट गावात जाऊन संबंधित ग्रामसेवकास पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी घेतला. त्यानुसार अपसिंगा गावात जाऊन पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक चैतन्य गाेरे यांना सीईओ फड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणानंतर गावात वृक्षाराेपण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, आनंत कुंभार, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव आघाव, सरपंच ॲड. सुजित कापसे आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
पहिलाच उपक्रम...
गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आजवर हा पुरस्कार जिल्हास्तरावर देण्यात येत हाेता; परंतु काेराेनाच्या संकटामुळे यंदा थेट गावात जाऊन पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांतून काैतुक करण्यात आले.