काक्रंबा गटात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:17+5:302020-12-27T04:23:17+5:30
काक्रंबा जिल्हा परिषद गटात बारूळ, जवळगा (मे.)वाणेगाव, सलगरा (दि.) येथे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून विविध पक्ष तसेच ...
काक्रंबा जिल्हा परिषद गटात बारूळ, जवळगा (मे.)वाणेगाव, सलगरा (दि.) येथे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून विविध पक्ष तसेच पॅनल प्रमुख उमेदवार चाचपणी करत आहे. या पाचही ग्रामपंचायतीवरील प्रशासक‘राज’ लवकरच संपुष्टात येऊन हक्काचे सरपंच लाभणार आहेत. यामध्ये बारूळ, वाणेगाव, किलज येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी बैठका चालू आहेत. जवळगा (मे.) येथील ग्रामपंचायत मात्र एका गावपुढाऱ्यामुळे बिनविरोध निघू शकली नाही. सलगरा व जळगा येथे दोन पॅनेलमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर असल्याने गाव पुढाऱ्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत. त्यातून पॅनल प्रमुख देखील कोड्यात पडले आहेत. खर्च कोण करणार? आणि केलाच तर तो आपल्या ऐकण्यात राहील का? याची शाश्वती कोण देणार, असा सूर ऐकावयास मिळत आहे. असे असले तरी ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी गाव पुढारी कामाला लागलेले दिसत आहे.