ग्रामपंचायतीने केला लाख रुपयांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:16+5:302020-12-31T04:31:16+5:30

(फोटो - इम्रान शेख ३०) ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नळपट्टी थकबाकीपोटी १ लाख रूपयांचा ...

The Gram Panchayat paid Rs | ग्रामपंचायतीने केला लाख रुपयांचा भरणा

ग्रामपंचायतीने केला लाख रुपयांचा भरणा

googlenewsNext

(फोटो - इम्रान शेख ३०)

ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नळपट्टी थकबाकीपोटी १ लाख रूपयांचा धनादेश मंगळवारी दिला. यामुळे लवकरच आता गावाचा पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी आणि कसबे तडवळे या गावांना तेरणा धरणावर कार्यान्वित असलेल्या जीवन प्राधीकरणाच्या योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, या तिन्ही गावांकडे मोठ्या प्रमाणात नळपट्टी थकल्यामुळे डिसेंबर महिन्यात प्राधीकरणाने या गावांचा पाणीपुरवठा बंद केला. काही दिवसांपूर्वी तेर ग्रामपंचायतीने पाणीटपट्टीचा भरणा केल्याने तेथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. ढोकी ग्रामपंचायतीकडे जीवन प्राधिकरणचे २६ लाख रूपये थकीत असून, या गावाचा पाणीपुरवठा देखील बंद केला होता. दरम्यान, ग्रामपंचायतने नळधारकांना पैसे भरण्याचे आवाहन केले होते. ग्रामस्थांनीही यास प्रतिसाद देत रक्कम भरल्यामुळे ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणकडे १ लाख रूपयांचा धनादेश दिला. त्यामुळे दोन दिवसात पाणी पुरवठा योजना चालू करण्यात येईल.

यावेळी सरपंच नाना चव्हाण, उपसरपंच अमोल समुद्र, ग्रा. पं. सदस्य शकील काझी, दत्ता तिवारी उपस्थित होते. ज्या नागरिकांनी पाणीपट्टी अद्यापपर्यंत भरलेली नाही, अशांनी ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टी भरणा करावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The Gram Panchayat paid Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.